Breaking

Search this Blog

13 February 2018

भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019

भारताचा वन अहवाल – 2019 जाहीर

  • केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय वन सर्वेक्षण अहवाल २०१९ नुसार महाराष्ट्राचे वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन २०१७ च्या तुलनेत ९८३१ चौ.कि.मी हून वाढून २०१९ मध्ये १०,८०६ चौ.कि.मी इतके झाले आहे.
  • ही वाढ ९७५ चौ.कि.मी आहे.
  • वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
  • राज्याच्या वनाच्छादनात सुद्धा ९६ चौ.कि.मी ची वाढ नोंदविण्यात आली आहे. 
  • देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाबाबत भारतीय वन सर्वेक्षण अहवाल दर दोन वर्षांनी प्रसिद्ध होतो. २०१७ ते २०१९ मधील वनस्थिती अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. 
  • कांदळवन क्षेत्रात १६ चौ.कि.मी ची वाढ 
  • याच अहवालात राज्यातील कांदळवनक्षेत्रात १६.२७ चौ.कि.मी ची वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. ही वाढ प्रामुख्याने रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे
  • महाराष्ट्र यात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.


भारतीय वन सर्वेक्षण अहवालात २०१४ ते २०१९ या कालावधीत ,४७,८१४ हेक्टर क्षेत्र नव्याने राखीव वन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्राचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. पर्यावरण समतोल आणि संरक्षणाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या भरीव कामगिरीची दखल या अहवालात घेण्यात आली आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल

महाराष्ट्राने वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी उपयोगात आणलेल्या माहिती तंत्रज्ञान सुविधांचा अहवालात आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. माय प्लँट ॲप, महाराष्ट्र हरित सेना, हॅलो फॉरेस्ट १९२६ आणि वनीकरणासाठी विविध घटकांचा सहभाग यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दलची विशेष दखल अहवालात विशेषत्वाने घेण्यात आली आहे.


भारताचा वन अहवाल – 2017
भारताचे एकूण वनक्षेत्र लाख हजार २७३ चौरस किलोमीटर आहे, जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २१.५४ टक्के आहे. वृक्ष आणि वनक्षेत्र मिळून लाख ,०८८ चौरस किलोमीटर म्हणजेच एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २४.३९ टक्के आहे. २०१५च्या तुलनेत भारताच्या घनदाट जंगलात .३६ टक्क्याने वाढ झाली आहे. जंगल क्षेत्रातील वाढ ,७७८ चौरस किलोमीटर असून वृक्षाच्छादन हजार २४३ चौरस किलोमीटर इतके वाढले आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक ७७ हजार ४१४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र असून त्यापाठोपाठ अरुणाचल प्रदेश ६६ हजार ९६४ आणि छत्तीसगड ५५ हजार ५४७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. एकूण भौगोलिक क्षेत्रासंदर्भात वनक्षेत्राच्या टक्केवारीनुसार लक्षद्वीप ९०.३३ टक्के आणि त्यापाठोपाठ मिझोराम ८६.२७ टक्के तसेच अंदमान निकोबार बेटे ८१.७३ टक्केआहे. या सर्वेक्षणात प्रथमच जलाशयांचे मूल्यांकन करण्यात आले असून गेल्या दशकात वनक्षेत्रात हजार ६४७ चौरस किलोमीटर वाढ झाली आहे.

महाराष्ट्र वनसेवा परीक्षा बद्दल माहिती

दृष्टिक्षेपात महाराष्ट्रातील वनक्षेत्र

अहवालानुसार महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र लाख हजार ७१३ चौ. किमी आहे. यापैकी ५० हजार ६८२ चौ.किमी. क्षेत्र वनव्याप्त असून ते भौगालिक क्षेत्राच्या १६.४७ टक्के आहे. यात हजार ७३६ चौ.किमी. हे अति घनदाट जंगल, २० हजार ६८२ मध्यम घनदाट जंगल, २१ हजार २९४ चौ. किमी विरळ जंगल तर हजार १६० चौ. किमी खुरटे जंगल आहे. राज्यात एकूण डोंगराळ जिल्हे असून त्यांचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६९ हजार ९०५ एवढे आहे. यापैकी १५ हजार ६२० हे वनक्षेत्र असून ते २२.३४ टक्के आहे. एकूण वनक्षेत्रात अति घनदाट जंगल ३१५, मध्यम घनदाट जंगल हजार २४५, विरळ जंगल हजार ५९ आणि खुरटे जंगल हजार ४१५ चौ. किमी आहे.

पाणथळ, खारफुटी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

या अहवालानुसार जंगलातील पाणथळ क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या जंगलातील पाणथळ क्षेत्र ४३२ चौ.किमी. आहे. तर ४२८ चौ.किमी. सह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे यादीत ३८९ चौ.किमी. सह मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील खारफुटी जंगलात एकूण १८१ चौ. किमी एवढी वाढ झाली असून यात एकटय़ा महाराष्ट्राचा वाटा ८२ चौ. किमी. एवढा आहे.

No comments:

Post a Comment

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा